Monday, May 9, 2022
पाणी टंचाईचे सावट ! परळी नगर परीषदेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर.
परळी वैजनाथ : तालुक्यात पाणी टंचाईचे सावट पसरत असताना परळी वै. नगर परीषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि गलथान कारभारामुळे शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते बस स्टैंड रोडवर आज सकाळपासुन परळी वै. नगर परीषदेच्या शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन लिकीजमुळे लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसू लागले. शहरातील बाजार पेठेत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागल्याने बाजार पेठेतील सराफा लाईन परीसरात पुर्ण रस्ता पाणीखाली गेल्याचे दिसू लागले. वाढत्या उष्णतेने तालुक्यातील नद्या तलाव कोरडे पडल्याने नागरीकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी शहरात पाण्याअभावी नागरीकांचे हाल होताना दिसतात. या सर्व प्रकाराची जाणीव असताना परळी नगर परिषदेकडुन पाणी पुरवठ्या बाबतीत होणाऱ्या हलगर्जीपणा मुळे आणि कर्मचारी अधिकारी यांच्या गलथान कारभाराने आज शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागले. हा प्रकार परळी वै. नगर परीषदेने पाणी पुरवठ्याची पाईप लाईन ही निकृष्ठ दर्जाची केल्यामुळे आज लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्याचे शहरातील नागरीकांचे मत येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment