परळी शहरापासून जवळच असलेल्या मौजे संगम येथून उदयास आलेले वारकरी सांप्रदायातील आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे. परळी शहरातच नव्हे तर कोठेही कोकाटे हे नाव घेतले की आपोआपच वारकरी मंडळ असा उल्लेख येतोच. कोकाटे व वारकरी हे जणू समीकरणच झालेले आहे. ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी परळी शहरात 35, परळी तालुक्यात 45 बीड जिल्ह्यात 350 तसेच संपूर्ण मराठवाडा भरात विविध ठिकाणी अ.भा.वारकरी महिला मंडळाच्या शाखा स्थापन केल्या असून राज्यभरातही मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. वारकरी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध महिला मंडळांना तबला, विणा आदी साहित्यही भेट दिलेली आहेत. आषाढी एकादशीनिमित्त परळी शहरात पंढरपूर कडे विठोबाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या रवाना होत असतात या दिंड्यांचे भव्य दिव्य स्वरुपात अभा वारकरी मंडळाच्या वतीने रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात येत असते.कोरोनाच्या काळातील अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांनी विविध रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे त्यांनी रुग्णांना दिलासा देण्यासोबतच अन्नधान्य, मास्क,कोरोना कीट आदी पुरविलेले आहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्याध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, व महादेव महाराज चाकरवाडीकर, प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके अतुल महाराज आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायातील मंडळींसाठी अहोरात्र झटणार्या, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणार्या तसेच युवकांच्या व मित्र परिवाराच्या गळयातील ताईत असणार्या अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा वृद्ध कलावंत समितीचे सदस्य ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा.
परळी शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मौजे संगम या गावी 10 मे 1977 रोजी ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांचा जन्म झाला श्री कोकाटे यांचे शालेय शिक्षण न्यू हायस्कूल थर्मल कॉलनी येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण परळी वैजनाथ वैजनाथ महाविद्यालयात पूर्ण होऊन एम ए ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता श्री कोकाटे यांनी वारकरी संप्रदायातील भगवी पताका हाती घेऊन सुप्रसिद्ध मृदंग वादक सुभाष महाराज देशमुख गुरुजी खामगावकर ,माऊली महाराज चाकरवाडीकर, अ.भा वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. सुरुवातीस वारकरी मंडळाचे पाच वर्षे सदस्य, पाच वर्षे तालुका अध्यक्षपद, पाच वर्षे जिल्हाध्यक्षपद,पाच वर्ष मराठवाड्याचे विभागीय अध्यक्षपद आणि आता महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असून ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुका व शहरात वारकरी मंडळाचे मोठे संघटन स्थापन झाली असून महिला मंडळाच्या संपूर्ण तालुक्यात 45 शाखा तर शहरात 35 शाखा तसेच जिल्हा साडेतीनशे शाखा स्थापन केल्या आहेत. ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वारकरी संप्रदायातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब व ज्येष्ठ नेते आदरणीय वाल्मीक आन्ना कराड यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा वृद्ध कलावंत समितीवर श्री कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या अर्धांगिनी सौ ज्योतीताई कोकाटे या इसवी सन 2007 ते 2012 या काळात मौजे संगम गावच्या सरपंच होत्या. या काळात त्यांनी गावात विविध विकास कामे केली होती .याच कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान मिळाला होता. इसवी सन 2017 ते 2021 या काळात श्री रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मातोश्री सौ वत्सलाबाई वैजनाथराव कोकाटे यासुद्धा मौजे संगम गावच्या सरपंच पदावर कार्यरत होत्या.
समाजसेवा हा शब्द ऐकायला आणि स्वत:च्या मागे पुढे लावायला तसा बरा वाटतो. परंतू जेंव्हा माणूस समाजसेवेत प्रत्यक्ष कार्यरत होतो तेंव्हाच या शब्दाचा अर्थ आणि त्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात येतात. समाजसेवा म्हणजे दोन बिस्कीटचे पुढे वाटणे किंवा मुलांना चॉकलेट खाऊ वाटप करणे असे काही नसते. तर समाजाला अपेक्षित असलेल्या कामासाठी जो पुढे येवून मदतीचा हात देतो, प्रत्यक्ष त्या क्षेत्रात कार्य करतो त्यालाच समाजसेवा म्हणायची. समाजाच्या कामासाठी जो कामी येतो तोच खरा समाजसेवक म्हणता येईल. अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केलेल्या अध्यात्मीक व समाज कार्यावर खूप काही लिहिता येईल परंतू त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून समाजसेवा या शब्दाचा अर्थ वास्तविक रित्या अंमलात आणला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठीचा लॉकडाऊन जेव्हा परळी शहर आणि तालुक्यात पुकारला गेला तेंव्हा अत्यंत गरजू व आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या घटकांना ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मदतीचा हात दिला आहे. समाजाने आपल्याला मोठे केले आहे तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे असे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे नेहमीच म्हणतात. त्याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेत आलो आहोत.
काही व्यक्ती आयुष्यात समाजासाठी बनतात. ज्या समाजात आपण राहतो. त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याचा ते कधीही विसर पडू देत नाहीत. त्या देण्यातून उतराई होण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. परमेश्वराने त्यासाठी त्यांना कलाविष्कार बहाल केलेले असतात.प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे जावे. कोणत्या वेळी कोणती बाजू घ्यावी त्या परिस्थितीचा सामना कसा करावा. आव्हानात्मक परिस्थिती आली तर मित्रासाठी खंबीरपणे उभा राहणारा हा उमद्या दिलदार वारकरी मित्र म्हणजे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे हे आहेत.
परळीपासून जवळच असलेल्या मौजे संगम येथे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध अध्यात्मीक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संगम या गावात विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिला भगिनींचा भव्य सत्कार असो, बुद्ध जयंतीनिमीत्त संगीत रजनी, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे पवित्र कार्य अखंडपणे सुरू आहे. ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे म्हणजे वारकर्यांच्या गर्दीत रमणारा, त्यांच्या सुख-दु:खात धावून जाणारा, गरीब व होतकरूंच्या मदतीला धावणारा त्यांच्या अडीअडचणीला मदतीचा हात पुढे करणारा अशा वारकर्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या भोवती वारकरी परिवाराची मोठी फौज असते.
मित्र परिवार, युवकांची वैयक्तीक कामे करीत असतांना ज्या ठिकाणी आपण राहतो त्या भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याकडेही त्यांचे विशेष लक्ष असते. कुुठलीही समस्या असो फक्त ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांना आवाज दिला की जोपर्यंत ती समस्या मिटत नाही तोपर्यंत ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे स्वस्थ बसत नाहीत. समाजाची समस्या असो की, मित्राची असो माझी समस्या समजून तन मन धनाने पाठीशी राहणार म्हणूनच अशा उमद्या दिलदार नेतृत्वाने हजारो वारकरी मंडळींची फळी तयार केली आहे. कोणाचा आजार असो कोणाची शिक्षणाची समस्या असो त्यात आत्मीयतेने चौकशी करून प्रत्यक्ष मदत करणार. त्यासाठी प्रसिद्धीचा बागुलबुवा करणार नाहीत. या हाताने दिले तर दुसर्या हाताला कळू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो. सार्वजनिक समस्या असेल त्या अधिकार्यांशी संपर्क करून त्या सार्वजनिक समस्यांच्या मुळाशी जाऊन ती कायमस्वरूपी सुटावी यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणूनचे ते आज सामाजीक अध्यात्मीक कार्यात अग्रेसर आहेत. ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे आपण आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर जीवन जगत असताना सर्व पात्र ताकदीने रंगवणार आपले व्यक्तीमत्व आपुलकीच्या भावनेने स्वत:च्या जीवाच रान करून सर्व समस्यांच्या अपेक्षाची पुर्तता करणारा आपला स्वभाव, सहनशिलतेने ज्यापुढे नतमस्तक व्हावे असे आपले विशाल मन, श्रावणाच्या इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगछटाने आपले आयुष्य अन् तेच जीवन सदा सुखी असावे ही प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणार्या, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणार्या युवकांच्या व मित्र परिवाराच्या गळयातील ताईत असणार्या ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.
लेखक
*श्री विश्वंभर महाराज उखळीकर*
तालुका अध्यक्ष वारकरी मंडळ परळी वैजनाथ
No comments:
Post a Comment