Saturday, May 14, 2022

गुरू-शिष्य परंपरा शिवसेनेचा इतिहास.धर्मवीर चित्रपट इतिहासाची साक्ष आहे - अभयकुमार ठक्कर.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गुरू शिष्य परंपरेबाबत आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. परंतू गुरू शिष्य परंपरा खर्‍य अर्थाने अनुभवयाची असेल तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी केले आहे.
गुरू-शिष्य परंपरा हा शिवसेनेचा इतिहास असून शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे नाते असेच गुरू शिष्याप्रमाणेच होते. गुरू शिष्य या पवित्र नात्याबद्दल बोलतांना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, गुरू शिष्य परंपरेचा इतिहास हा जुना असून अतिशय पवित्र आहे. 
धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील गुरू शिष्य भक्ती हा या चित्रपटाचा आत्मा असून अतिशय चांगल्या पद्धतीने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकांनी हा चित्रपट गुरू शिष्य परंपरेला समोर ठेवून आवर्जुन पहावा असे आवाहन  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment