मुंबई (प्रतिनीधी) :- ”काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखे वाटते, राज ठाकरे आता हिंदुत्वाची शाल पांघरत आहेत. राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस आहे, कधी मराठीच्या कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात यांनी कधी जनतेची कामं केलीत का? असा खणखणीत सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईतील बिकेसी मैदानावरील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ”आज यांना हिंदुत्वाचा खोटा पुळका आला आहे, पण शिवसेनेचे हिंदुत्व नसते तर आज तुम्हीसुद्धा भोंग्यात असता असा टोलाही राज ठाकरेंसहीत भाजपलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
आज जे काही तमाशे राज्यात सुरु आहेत ते बंद करा, एकत्र या मी पुढे पाऊल टाकतो असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच आमचे माझे सरकार मजबूत आहे; त्यापेक्षाही जास्त मजबूत आमचे शिवसेनेचे मावळे आहेत असेही त्यांनी ठणकावले
No comments:
Post a Comment