Saturday, April 9, 2022

मोठया बहिणीबरोबर लग्न जमले मे महिण्यात होते लग्न. पण लहाणी सोबत प्रेम जुळले दोघे झाले सैराट. पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

 

जालना : मोठ्या बहिणी बरोबर लग्न जमले ….. मग फोनवर बोलणं सुरू झालं … त्याच वेळी लहानगीही अधून – मधून बोलायला लागली . लहानगीशी मग बोलणं वाढत गेलं … आणि त्यातूनच लहानीवर प्रेम जडलं अन् मंगळवारी सकाळी एका शाळेतून तिला पळवून घेऊन गेल्याची घटना जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात घडली आहे . पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . अजय गायकवाड ( रा.पैठण ) असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे कळते.

अजय गायकवाड हा मूळचा अहमदनगरचा . त्याचे आई – वडील काही वर्षांपासून पैठण येथे , तर आजी – आजोबा हे जालन्यात राहतात . त्याचा काही महिन्यांपूर्वी एका तरुणीशी विवाह जुळला . हा विवाह मे महिन्यांत होणार होता . त्यामुळे दोघांचेही मोबाइलवर बोलणे सुरू झाले . अधून – मधून त्या तरुणीच्या १४ वर्षांच्या लहानग्या बहिणीलाही तो बोलू लागला . त्यांच्यात बोलणं वाढत गेलं . त्यातून तिच्यावर प्रेम जडलं . अल्पवयीन असल्याने त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् पळवून जाण्याचा प्लॅन आखला . काही दिवसांपूर्वीच तो आजी आजोबांकडे आला मंगळवारी सकाळी ती अल्पवयीन मुलगी शिकत असलेल्या शाळेत गेला .

शिक्षकांना मुलीच्या पोटात दुखतंय , तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे , असे खोटे सांगून घेऊन गेला . या प्रकरणी सायंकाळी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी तत्काळ पथके तैनात करून , सायंकाळी जालना – अंबड रोडवरील हरतखेडा फाट्याजवळून अजय गायकवाड याला मुलीसह ताब्यात घेतले . अजय गायकवाड हा अल्पवयीन मुलीला घेऊन पायी पैठणकडे निघाला होता . ते दोघे जवळपास २५ किलोमीटर पायी चालले .

No comments:

Post a Comment