बेलापूर (प्रतिनीधी ) :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. गावा जवळील अहमदनगर - श्रीरामपुर बायपास रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने त्या परिसरात नेहमीच अपघात होतात.लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजमितीस या गावातील लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहिवास तसेच व्यापारी दुकाने असल्याने नागरीकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जावे लागते या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची रहदारी चालू असल्यांमुळे तथा रस्त्याच्याकडेला लोकवस्त्या आणि लगतच श्रीदत्तमंदिर आहे, भाविकभक्त नेहमी दर्शनासाठी तथा लहान मुले,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा चालु असते, या कारणाने तेथील लोकांना नेहमीच अपघातांची भिती वाटत होती. बऱ्याच दिवसांपूर्वी त्या परिसरात अपघात झाला होता. छोटे छोटे अपघात या ठिकाणी रोजच होत आहेत.अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बेलापूर येथील गौसे आजम सेवा भावी संस्था यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यांना निवेदन देण्यात आले होते, या निवेदनात असे म्हटले होते की, लवकरात लवकर कोल्हार चौक,श्रीरामपुर - अहमदनगर बायपास रोड, श्रीदत्तमंदिरा समोर गतिरोधक बसवण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यांनी याबाबी लक्षात घेता गतिरोधक असणे गरजेचे आहे हा विचार करत श्रीरामपुर - अहमदनगर बायपास रोडवरील कोल्हार चौक परिसरात दोन गतिरोधक बसविण्यात आले आहेत, बेलापूर येथील गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या मागणी यश आल्यामुळे गौसे आजम सेवाभावी संस्थेचे संस्थापक - मुख्तार सय्यद व अध्यक्ष - सुलतान शेख आणि पदाधिकारी,कार्यकर्ते व बेलापुरातील नागरिकांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment