Saturday, April 9, 2022

बांबू लागवड शेतकऱ्यासाठी उत्तम पर्याय बांबू पासून होणार आता कापड निर्मिती…. तीन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन.


बीड (प्रतिनीधी)   बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर शेतीचा एक उत्तम पर्याय म्हणून सध्या चर्चेत आला आहे. याबाबत माहिती करीता राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माहिती करीता कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात देखील उद्या कार्यशाळा होत आहे

बांबू पासून विविध उत्पादनं होत आहेत. विज निर्मिती करीता बांबूचा वापर होणार आहे. इथेनॉल करीता बांबूचा वापर होणार आहे. टुथब्रश बनवण्यासाठी बांबूचा वापर होणार आहे. घर बांधणी करीता, फर्निचर करीता बांबू वापरला जाणार आहे आणि एवढेच नाही तर आता बांबू चक्क कापड निर्मिती करीता देखील वापरले जाणार आहेत. ते कसे वापरणार त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार याच्या माहिती करीता आज उस्मानाबाद उद्या बीड आणि परवा लातूर या ठिकाणी शेतकऱ्यांना कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

नदीच्या काठावर, पडीक जमीनीवर बांबू लागवड अनेक ठिकाणी झाली आहे. बांबूची शेती फायदेशीर शेती ठरत आहे. भरवशाची शेती ठरत आहे. त्यापासून शास्वत उत्पादन शेतकऱ्यांना मीळणार आहे. कमी अधिक पावसाचा जास्त परीणाम त्यावर होत नाही यामुळे उत्पादन चांगले मिळते.
बांबूच्या शेतीतून शेतकऱ्यांना कशा संधी आहेत . लाखे रूपयांचे उत्पादन कसे शक्य आहे याची माहिती देणारी कार्यशाळा शेतकरी यांनी करावी म्हणजे या नव्या पर्यायाबाबतीत चांगली माहिती होईल.

No comments:

Post a Comment