Saturday, April 9, 2022

वंचित बहुजन आघाडीच्या उपोषणाला यश लेखी आश्‍वासना नंतर उपोषण मागे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या उपोषणाला यश आले असून लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.                                याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यातील नाथरा या गावातील बौद्ध समाज मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निवारा करण्यात यावा तसेच नाल्या दुरुस्ती व विद्युत खांब सह लाईट दुरुस्ती करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी पंचायत समितीच्या पुढे काल दिनांक 8 रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले असून या उपोषणाची लेखी आश्वासने सांगता करण्यात आली असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे जिल्हा सचिव अॅडवोकेट संजय रोडे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे सर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संजय गवळी तालुका महासचिव विष्णुपंत मुंडे तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार शा खान युवक नेते राजेश सरोदे युवक कार्यकर्ते अमित सावंत भीमा कसबे यांच्यासह नाथरा येथील वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते गौतम आदमाने यांच्यासह गावातील अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते लवकरच  या समस्या कामे केली जातील असेही लेखी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment