कांतीकारी साथी न्यूज
राज्यातील सर्व ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत ०६ जुन रोजी 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्या बाबतच्या सूचना राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्याच्या ग्राम विकास खात्याचे उपसचिव पं.खं. जाधव यांनी दि-01जून 2021 रोजी दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिल्या आहेत. या पत्रकात ०६जून रोजी ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत 'शिवस्वराज्य दिन' कसा साजरा करावा, याबाबतीत नियम सांगितले आहेत.
'भगवा स्वराज्य ध्वजसंहिता आणि शिवशक राजदंड स्वराज्य गुढी' हे शिवस्वराज्य दिनाचे मुख्य अंग आहेत. त्यानुसार ०६जून रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत नमूद कार्यालयात ३×६ आकाराचा भगवा ध्वज, ज्यावर शिवमुद्रा ,सुवर्णहोन, जिरेटोप, जगदंब तलवार आणि वाघनखे असे शिवरायांची पाच शुभचिन्ह अलंकृत असावेत. १५ फुट उंच वासा किंवा बांबुला लाल किंवा सुवर्ण कपड्याची गुंडाळी करून त्यावर भगवा ध्वज उभारण्यात यावा राजदंड गुढी टोकावर सुवर्ण कलश बांधावा व त्यावर अष्टगंधाने 'शिवशक राजदंड स्वराज्यगुढी' असे लिहून त्यावर 'अक्षता' लावाव्यात नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, हळद कुंकू वाहून महाराष्ट्र गीत किंवा राष्ट्रगीत म्हणून सांगता करावी अशा सूचना नमूद पत्रकात दिलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment