कांतीकारी साथी न्युज – बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी राजकीय घडामोडी होत आहे, लोकजनशक्ती पार्टीच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली आहे. आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. सूरजभान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या अगोदर चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं होतं.
लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत

No comments:
Post a Comment