परळी वैजनाथ (प्रतिनिधी) -आजच्या परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे व मास्क वापरणे किती महत्त्वाचे आहे सर्वांनाच माहीत आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन व आरोग्य यंत्रणा मास्क वापरण्याचे महत्त्व वारंवार सांगत आहेत. मास्क लावला नाही म्हणून आणि त्यांना मोठा दंड देखील भरावा लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचे महत्व जनसामान्यांच्या मनावर बिंबवणे याची सर्वात मोठी जबाबदारी तर आरोग्य यंत्रणेवर आहे.
या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः मास्क चा वापर करून इतरांपुढे उदाहरण घालून देणे आवश्यक आहे. असे असताना परळी तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांना मात्र मास्क वापरणे आवडत नाही असे वाटते. स्वतः एक जबाबदार असे तालुका आरोग्य अधिकारी असूनही त्यांना मास्क चे वावडे का असावे. कारण सार्वजनिक कार्यक्रमात देखील ते मास्क वापरताना दिसत नाहीत.
काही दिवसांपूर्वी एका महिला संघटनेचे कौतुक करताना त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यात सोशल डिस्टंसिंग आणि मास्क दोन्हीचा अभाव होता. तर त्या संघटनेकडून निवेदन स्वीकारतानाचा दुसरा एक फोटो प्रसिद्धी माध्यमांकडे आला आहे.दोन्ही फोटो वेगवेगळ्या दिवशीच्या प्रसंगातील आहेत. दोन्हीत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत नाही. मास्क वापरला नाही म्हणून सर्वसामान्यांना दंड लावायला सरसावणारे यंत्रणा आता अशा अधिकाऱ्यांवर कोणता दंड लावते ते पाहूया.
No comments:
Post a Comment