Wednesday, June 16, 2021

तलवाडा ग्रामपंचायतने पावसाळ्याच्या तोंडावर केली गाव स्वच्छता मोहिम सुरु.

 तलवाडा-(कांतीकारी साथी न्युज  ) 
पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच तलवाडा ग्रामपंचायत चे सरपंच विष्णू हत्ते उपसरपंच अज्जुशेठ सौदागर यांनी आंबेडकर पुतळा ते पोलीस स्टेशन रस्त्यालगतच्या वेड्या बाबळी जेसीबीच्या साह्याने काढून आंबेडकर पुतळा ते पोलिस स्टेशन या रस्त्याची पानी जाण्यासाठी नाली तयार करून श्वास मोकळा केला तसेच गणेश नगर येथे मुरूम टाकून लोकांना चालण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य नारायणराव मरकड, बळीराम शिंदे, गणेश महाराज कचरे, दिलीप नाटकर, जाधव एल जी सर, रवी गांधले, विठ्ठल चव्हाण सोमनाथ काळे, दिगंबर सावळा पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कामकाज सुरू करण्यात आले सरपंच आणि उपसरपंच यांच्या नियोजनबद्ध  व योग्यतेनुसार विकासकामावर भर देण्यात येत आहे तलवाड्यातील सर्व ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत चे कौतुक करण्यात येत आसुन पुढील विकास कामा साठी आशा पल्लवीत झाल्या आहेत*

No comments:

Post a Comment