Tuesday, May 5, 2020

परळीत लाॕकडउन शितीलच्या काळात मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी.

* सकाळचा वेळ पडतो  कमी,प्रशासनासाठी  ठरतीय कसरत .

परळी वैजनाथ ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला दुसरा आणी आत्ता तिसऱ्या लाॕकडाउनची घोषणा झाली.पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व सेवा वगळता इतर सर्व व्यापार बंद केल्या.दुसऱ्या टप्प्यात काही अत्यावश्यक सेवा म्हणुन कृषी सारख्या व्यवसायाना काही प्रमाणात मुभा देण्यात आली.आणी आत्ता अत्यावश्यक सेवा सह इतर व्यवसायांना व्यवसाय करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनानी दिली त्यामुळे नागरिक व्यापारी समाधान व्यक्त करत होते.परंतु सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंतचा वेळ आणी तो ही दिवसा आड त्यात काही व्यापार 17 मे पर्यत केवळ दोन किंवा तीन वेळाच करता येणार असल्याचा हुकुम जिल्हाप्रशासनाने काढला गेला.जिल्हावासीयांच्या आरोग्याची खबरदारी घेणारा निर्णय असला तरी सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंत काही मोजके धंदे सोडले तर इतर कुढलाही धंदा व्यापार होणे शक्य नाही तब्बल चाळीस दिवस लाॕकडाउन मध्ये अडकलेल्या नागरिकांना विविध वस्तुंची खरेदी करायची आहे.सहाजीकच आहे हे नागरिक सकाळच्या या कमी वेळात एकदाच बाहेर पडणार आणी गर्दी होणार मग त्यात आपसुकच सोशल डीस्टंसचा फज्जा उडणार कमी वेळात जास्त खरेदी करण्याचा नादात कोरोनाला निमंत्रण मिळणारआहे.
आॕंरेज झोन मधुन ग्रिन झोनमध्ये आपला जिल्हा अंतरभुत होतोय ही समाधानाची बाब आहे प्रशासनाचे उत्तम नियोजनाच फलित म्हणावे लागेल.नागरिकांना एक दिवसाआड सकाळी 7ते9-30 चा वेळ खरेदीसाठी कमी पडतोय हे मान्यच कराव लागेल जरुर काही नियम अटी लावा पण वेळ वाढवुन द्या अशी मागणी व्यापारी करत आहेत.शिवाय खरेदीला आलेल्या नागरिकांना ही खरेदी करता येईल अन्याथा हीच वेळ आणी हेच दिवस राहतील तर गर्दीतर होणार आणी प्रशासनाला ही ताण येणार शिवाय कोरोनाच्या पादुर्भावाला निमंञण मिळणार हे नक्की आहे.
दरम्यान कोरोना बाबत नागरिक अजूनही गंभीर नसल्याचं दिसून आलं. परळी शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक तसेच बँका बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टनचा फज्जा उडल्याचं दिसून आलं. एरवी असलेल्या गर्दीपेक्षा आज अधिक वर्दळ पहायला मिळाली.
इतर आॕरेज ग्रीन झोन जिल्ह्या प्रमाणे आम्हाला ही सुविधा मुभा मिळावी अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत..

No comments:

Post a Comment