परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परळी वैजनाथची नवीन कार्यकारिणी आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. देवगिरी प्रांताध्यक्ष आदरणीय डॉ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत तालुका अध्यक्षा म्हणून चित्राताई देशपांडे, तर तालुका महिला प्रमुख म्हणून विजयाताई दहिवाळ यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष – श्री. रामेश्वर महाराज कोकाटे, सहउपाध्यक्ष – विद्या खिस्ते, सचिव – गोपाळ आंधळे, सहसचिव – संध्या सरोदे व प्रीती टाक, कोषाध्यक्ष – तारावती अग्रवाल, प्रचारप्रसिद्धी प्रमुख – श्री. पद्माकर उखळीकर, पर्यावरण प्रमुख – श्री. चेतन सौंदळे, लीगल सेल प्रमुख – अॅड. अशोक शहाणे अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास मोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अण्णा कोपूलवार उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान चित्रा देशपांडे, विजयाताई दहिवाळ, विद्या खिस्ते, तारावती अग्रवाल व संध्या सरोदे यांनी केला.
विजयाताई दहिवाळ यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची प्रस्तावना मांडत संस्थेचे ध्येय-उद्दिष्ट व वर्षभर झालेल्या बैठकींचा आढावा सादर केला. त्यानंतर चित्राताई देशपांडे यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सरोदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अॅड. अशोक शहाणे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे यांनी ग्राहक पंचायतचे महत्त्व, समाजातील ग्राहक जनजागृती आणि संघटनेच्या कार्याची गरज याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवीन सदस्यांना संस्थेच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास श्री. दिलीप जोशी, जालंदर नाईकवाडे, जयश्री माने, अनिता मानवतकर, मंगल भोयटे, सुनंदा निर्मळे, सुनिता बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर परळी तालुक्यातील सर्व सदस्यांकडून नवीन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment