बीड (प्रतिनिधी) शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपी अटक झाले असून शिंदे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिराळे अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शुक्रवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेत बसून यशच्या मित्र आणि मैत्रिणींची कसून चौकशी केली. त्या रात्री काय घडले? आणि नेमके कारण काय? याची माहिती घेण्यात आली.
त्या’ मुलीचीही केली चौकशी.
यश ढाका याचा खून मुलीला का बोलतो या कारणावरून झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणातील मुलीचीही चौकशी करण्यात आली. सोबतच त्याचे मित्र आणि व्हायरल व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदींची उपस्थिती होती.
ढाका कुटुंबीयांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट.
मोकाट असलेल्या दोन आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ढाका कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. ॲड. आंबेडकर यांनी तत्काळ वकिलांशी चर्चा केली, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, अमरसिंग ढाका, डॉ. नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम ऊर्फ गोटू वीर, लखन जोगदंड आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment