परळी वैजनाथ (वार्ताहर) आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा ही कोजागरी साजरी करण्यात आली. ही पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची मानली जाते आणि तिच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संगम येथे कोकाटे महाराज परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व यावेळी जनाई महाराज कोकाटे यांनी सांगितले
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि "को जागर्ति" (कोण जागा आहे) असे विचारते, म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध धार्मिक विधी केले जाते भजन गाऊन दूध तापविले जाते चंद्राचे किरण यामध्ये दुधामध्ये पाहाण्याचे महत्त्व आहे असं कोजागिरी पौर्णिमा चे उत्सवाचे स्वरूप आहे लक्ष्मी पूजा घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा करण्यात आली.
- दुग्ध पौर्णिमा काही ठिकाणी दुग्ध पौर्णिमा म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो, जेथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे महत्त्व असते.
- *सांस्कृतिक कार्यक्रम*: विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, अभंग गवळण भावगीत भक्ती गीत भजन, आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जनाई महाराज कोकाटे यांच्या मधुर आवाजातून सर्वांना मार्गदर्शन भेटले अभंग गाऊन मंत्रमुग्ध केले सुरेश मोरे सर बब्रुवाजी गिराम आनंदी कोकाटे यांनी सुंदर मृदंग वाजविला श्रावणी कोकाटे यांनी गोड असं गायन केलं अंकिता चव्हाण यांनी सुंदर गवळणी सादरीकरण केल्या यावेळी सर्व गावातील भजनी मंडळ उपस्थित होते
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा यावेळी रामेश्वर महाराज कोकाटे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या
या दिवशी केलेली पूजा आणि उपवास धनधान्य आणि सुखसमृद्धी प्रदान करतात
विशेष उपक्रम मंदिरांमध्ये विशेष पूजा मंदिरांमध्ये आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते घरी लक्ष्मी पूजालोकांनी आपापल्या घरी देवी लक्ष्मीची पूजा केली आणि आरत्या केल्या बरोबर बारा वाजता भैरवी या रागाने सांगता करण्यात आली आणि सर्वांनी दूध ताकविलेले सर्व मसालेदार पदार्थ टाकून गोड असं दूध सर्वांनी प्राशन केले या दुधाचा आनंद सर्वांनी घेतला सर्वांचे आभार रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मांडले
No comments:
Post a Comment