परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वातावरण चांगले निर्माण झाले सगळेच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत याच काळात आता छत्रपती संभाजी नगर मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडून की ची प्रक्रिया डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे.
त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या वतीने पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू आहे. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे.जो पदवीधर 1नोव्हेंबर 2022 रोजी कोणत्याही शाखेतून. राज्यातील कुठल्याही विद्यापीठातून पदवी पास झालेला आहे ते सर्व छत्रपती संभाजी नगर मराठवाडा पदवीधर मतदानास पात्र आहेत. तरी आधी नोंदणी केलेल्या असेल तरी सर्वानी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी मराठवाड्यातील जास्ती जास्त मतदारांनी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. वर्षा मगर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment