Monday, May 26, 2025

दहावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन.कु.भक्ती कैलास रिकीबे हिचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, वीरशैव विकास प्रतिष्ठान आणि लिंगायत समाज परळी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळयात भक्ती कैलासअप्पा रिकीबे हिने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देवून मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बेलवाडी येथील संत गुरुलिंग स्वामी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, अ‍ॅड. गिरीश चौधरी (सेक्रेटरी, संत गुरुलिंग स्वामी मंदिर), श्री वक्रेश्वर मंदिराचे विश्वस्त नारायण आप्पा खके, दयानंद स्वामी, सुभाष आप्पा भिंगोरे, समर्थ शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव प्रभाकर इटके, तसेच प्रकाश खोत आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक अशोक नावंदे गुरुजी यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय स्वामी सर यांनी आणि आभार प्रदर्शन सोमनाथ गोपनपाळे सर यांनी केले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम बुद्रे, सचिव प्रा. सुधीर फुलारी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके, परळी शहराध्यक्ष नितीन समशेट्टी, कार्याध्यक्ष रमेश चौडे, उपाध्यक्ष शिवकुमार केदारी, सहसचिव विकास हालगे, वैजनाथ बँकेचे संचालक महेश्वर निर्मळे, दैनिक लोकमतचे पत्रकार संजय खाकरे, पत्रकार संतोष जुजगर, तलाठी रमाकांत गुजर, संजय कोरे, नागेश फडकडी, नागेश हाते, राहुल निर्मळे, नरेश पिंपळे, बंडू चौंडे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment