Wednesday, May 28, 2025

महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार स.पतसंस्थाच्या संचालकपदी रवि मगर पाटील यांची बिनविरोध निवड.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी येथील महात्मा ज्योतीबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था परळी वै.च्या संचालकपदी श्री रवि मगर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महात्मा ज्योतीबा फुले  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स.पतसंस्था परळी वै.च्या संचालकपदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांची निवड व्हावी ही अनेक दिवसापासून असलेल्या मागणीस कार्यकारी मंडळाने संम्मती दर्शवुन एकमताने ठराव पारीत करुन शिक्षकेत्तर सभासदांच्या मागणीचा विचार करून श्री रवि मगर पाटील यांची  निवड करण्यात आली यावेळी सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व सर्व संचालक मंडळाचे  रविभैय्या मगर पाटील यांनी आभार व्यक्त केले व सदरील पतस्थेची पत व दर्जा सुधारण्यास सर्वतोपरी सहकार्य राहिल असे अभिवचन दिले.

No comments:

Post a Comment