*संस्थेचे मार्गदर्शक अँड विष्णुपंत सोळंके यांच्याकडून त्यांचा सत्कार*
परळी वैजनाथ :- येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला व आदर्श मल्टी स्टेट सहकारी पत संस्था स पीपल्स को बँकेचे चेअरमन तथा अंबाजोगाई नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजकीशोर पापा मोदी यांनी सदिच्छा भेट दिली.
पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी सहकारी चळवळीच्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आणि संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबईचे उपाध्यक्ष एडवोकेट विष्णुपंत सोळुंके , श्री . चंद्रशेखर समशेट्टी माजी नगर सेवक तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवलिंग आप्पा मरळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी राजकिशोर मोदी यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेने केलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment