Saturday, November 2, 2024

शिवसेनेच्या वतीने दीपावली,लक्ष्मीपुजना निमित्त व्यापाऱ्यांना दिल्या शुभेच्छा.व सदिच्छा भेटी.

परळी वैजनाथ( प्रतिनिधी ) देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने लक्ष्मीपुजना निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या शिवसैनिकांनी परळी वैजनाथ नगरीतील व्यापाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
गेल्या पंचवीस वर्षापासुन शिवसेनेच्या वतीने दीपावली निमित्त परळी वैजनाथ नगरीतील विविध व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकाने जाऊन प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची परंपरा असुन यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर , युवासेना मा .बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, शिवसेना विधानसभा संघटक सतीश जगताप युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना मा. शहर संघटक संजय कुकडे, मा.उपशहर प्रमुख किशन बुंदिले, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, विद्यार्थी सेनेचे प्रकाश देवकर, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश घेवारे,नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड, मनीष जोशी, लक्ष्मण मुंडे, प्रवीण सटाले, यांच्या सह शिवसैनिकांनी परळी वैजनाथ शहरातील विविध व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment