Tuesday, November 26, 2024

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस भावी मंत्र्यांचीही नावे ही ठरल!


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे. यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाईल असेही सांगण्यात येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रीपद देण्यात येईल अशीही माहिती समोर येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. यातच राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजीपाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, यांची नावे समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोडभरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे.

अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम. अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment