Tuesday, October 8, 2024

रोडच्या समस्ये बाबत गांभीर्य नसल्याने धानोरा रोड परिसरातील नागरिकांचा विधा नसभा निवडणुक मतदानावर बहिष्कार.

बीड (प्रतिनिधी) शहराशी अनेक गावांना जोडणारा बीड शहरातील एक प्रमुख रस्त्यात गणना असलेला धानोरा रोड नगर रोड ते पालवन चौक या दीड ते दोन किलोमीटर अंतरात रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे शिवाय अनेक छोटे मोठे अपघातही यामुळे होत आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धानोरा रोडच्या कामासंदर्भात लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण करण्यात आले यावेळी हजारो लोक, लहान मुलं रस्त्यावर उतरले परंतु बीड नगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना रस्त्याच्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची बाब या निमित्ताने समोर येत आहे. 
उपोषण वेळी बीड नगरपरिषद कार्यालय यांच्या पत्रानुसार अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुक 2024 मतदानावर धानोरा रोड परिसरातील सुज्ञ नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्या बाबत चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment