Friday, October 4, 2024

मनस्विनी च्या वतीने मुलीन साठी एम.एस सी. आय. टी.कोर्सची सुविधा उपक्रमाचा शुभाऱभ.

किल्लेधारूर (प्रतिनिधी) मानवलोक संचलीत मनस्विनी प्रकल्पाचे वतीने निर्धार समानतेचा या प्रकल्पाचे माध्यमातून असुरक्षीत व गरजू तालूक्यातील मुलीना एम एस सी आय टी कोर्स प्रशिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे यांचा उदघाटन सोहळा नुकताच संपऩ्न झाला यावेळी निवड झालेल्या मुलीना मार्गदर्शन करण्यात आले
युरोपियन युनियनच्या अर्थ सहाय्याने आणि स्विसेड इंडियाच्या मध्यस्थीने मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पांतर्गत डॉ.अरुंधती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "निर्धार समानतेचा" या प्रकल्पाच्या माध्यमातून असुरक्षित व गरजू मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत एम.एस.सी.आय.टी. कोर्सचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे या *कौशल्य विकास प्रशिक्षणाचा* आज मनस्विनी महिला प्रकल्प कार्यालय धारूर येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास धारूरचे  ज्येष्ठ पत्रकार .अनिल महाजन  अध्यक्ष म्हणून तर  येथील प्रसिद्ध उद्योगपती  रत्नाकर काका चिद्रवार हे या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्देश व प्रमुख मार्गदर्शन निर्धार समानतेचा प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक राहुल निपटे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैला मुळूक,प्रास्ताविक सुरेश राठोड यांनी तर आभार अश्विनी बुरकुले यांनी मानले या कार्यक्रमास असोल्याचे प्रेरक नितीन चोले हे देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment