Friday, December 9, 2022

खळबळजनक ! निर्दयी मुलाने आईची हत्या करून मृतदेह माथेरानच्या खाडीत फेकला मुलासह एकाला अटक.

मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतून खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील जुहू परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची निर्घृण हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी मुलाने नोकरासह मृतदेह माथेरानच्या खाडीत फेकून दिला.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन आणि नोकर लालू यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू येथे राहणाऱ्या वीणा कपूरचा मुलगा सचिनसोबत मालमत्तेवरून वाद होता. भांडण इतके वाढले की, नोकरासह मुलाने लाथा-बुक्क्यांनी व बॅट ने बेदम मारहाण केली.

न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी सांगितले की, महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मुलाने घरकाम करणाऱ्या नोकरासह मृतदेह एका पेटीत बांधून माथेरानच्या खाडीत फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment