बीड (प्रतिनिधी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरजू व होतकरू वाटपाचा कार्यक्रम सुरू ८ डिसेंबर गुरुवार रोजी ५:३० वा. राजगृह बुद्ध विहार, भीम नगर, जुना मोंढा, बीड येथे मोफत शिकवनी वर्ग शिक्षकाचे नोव्हेंबर महिन्याचे मानधन देऊन, डाँ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमीत्त गरीब व होतकरु २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही व पेन वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु. आर.डी.चक्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाचे आयु.डी.जी. वानखेडे हे लाभले. सर्वप्रथम तथागत भगवान बुध्दांना पुष्प तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण - पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी या बालकांना चांगल्या प्रकारे अपेक्षित असं मार्गदर्शन कॅप्टन राजाभाऊ आठवले, डी.जी. वानखेडे व आर.डी.चक्रे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम.भोले सर यांनी केले. तर आभार आयु. संगमित्रा वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास डी.एम. राऊत, बी.जी. दळवी, अर्जुन घोडके, घोडके ताई, समता सैनिक अपेक्षा घोडके, मोफत शिकवणी वर्गाचे शिक्षक आयु. रवींद्र टेकाळे व अनेक स्थानिक महिला व पुरुषांची उपस्थिती लाभली. शालेय साहित्य वाटप करून सरणयतयांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महामानव मोफत शिकवाणी वर्ग, महामानव अभिवादन ग्रुप,
सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय, बीड.
No comments:
Post a Comment