*हाजारो महिला या राजकिय लोकशाही पासून वंचित अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठवला जाईल .
परळी वैजनाथ ( प्रतिनिधीं ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत महिलाला 50 % आरक्षण असून ही तीन अपत्यांची विसंगत अट रद्द करा अशी मागणी मा. मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कडे परळी तहसिलदार तथा निवडणूक निर्णय आधिकारी यांच्या मार्फत अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा च्या उपाध्यक्ष आणि कन्हेरवाडी ग्रामपंचात निवडणूकचे उमेदवार सौ. मिरा लहुदास रोडे यांनी एका निवदेना द्धारे केली आहे अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात येईल असे म्हटले आहे
दरम्यानच्या काळात अनेक महिला मातृत्व लाभ 1961 नुसार तिसरे अपत्य दमक देऊन निवडणुका लढत आहेत तर हाजारो महिला तिसरे अपत्य असल्यामुळें 50 % आरक्षण असून ग्रामपंचायतीच्या राजकिय लोकशाही पासून वंचित राहत आहेत . विधान सभा आणी लोकसभा निवडणुकीत तीन अपत्यांची अट ठेवली नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत तीन अपत्यांची जी विसंगत आणी महिलांना राजकिय लोकशाही पासून वंचित ठेवणारी विसंगत अट रद्द करा आणि ज्या उमेदवाराने आर्थिक खर्चाची घालुन दिल्येया मर्यादेचे उलंघन केले आहे त्याची उमेदवारी रदद करा अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कडे परळीचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय आधिकारी यांच्या मार्फत अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा च्या उपाध्यक्षा आणी कन्हेरवाडी ग्रामपंचायत निवडणूका च्या उमेदवार सौ. मिरा रोडे यांनी केली आहे अन्यथा न्यायालयात एका जनहित याचिका द्धारे न्याय मागितला जाईल असे एका प्रसिद्धीपत्रका द्धारे कळवले आहे
No comments:
Post a Comment