सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असून, त्यांच्या मंत्र्यांना बेळगावला न पाठवण्यास सांगणार आहे. ते म्हणाले, या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. यासोबतच सीमाभागात कडक पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही राज्यांमधील सीमावादाच्या दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे उद्या म्हणजेच 6 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावी येथे जाणार आहेत. यादरम्यान ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी सीमा वादावर चर्चा करतील. याआधी दोन्ही मंत्र्यांना ३ डिसेंबरला बेळगावी भेट देण्याचा प्रस्ताव होता.
No comments:
Post a Comment