Friday, December 2, 2022

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रेहान यास क्रिकेटमध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल क्रीडा शिष्यवृत्ती.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा रेहान अजिमोद्दिन शेख या विद्यार्थ्यास क्रिकेट या खेळात क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली आहे.
 क्रिकेट या खेळामध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेला रेहान अजिमोद्दिन शेख हा विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे या विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख मॅडम यांच्या हस्ते नुकताच  बीड या ठिकाणी धनादेश देण्यात आला.
क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेला विद्यार्थी रेहान अजिमोद्दिन शेख याचे नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. धनंजयजी मुंडे साहेब, सहसचिव प्रदीपजी खाडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा.अतुल दुबे,परळी तालुका क्रीडा समन्वयक संजयजी (पापा) देशमुख यांच्यासह परळी वैजनाथ  तालुक्यातील क्रीडा शिक्षक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन आले आहे

No comments:

Post a Comment