हिंगोली (प्रतिनिधी) हिंगोली जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर व ईतर जिल्हयात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व खुनाचे गुन्हे करणारा सराईत व अटटल दरोडेखोर आरोपी नामे कैलास रमेश शिंदे रा. कोहिनुर कॉलनी कौठा रोड, वसमत जिल्हा हिंगोली हा बरेच कालावधी पासुन चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व खुनाचे गुन्हे करून फरार होता व त्याचा बराच शोध घेवुन देखील सदर आरोपी हा पोलीसांना हुलकावनी देत होता. सदर आरोपीने नांदेड व लातुर जिल्हयात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने नांदेड व लातुर जिल्हयातील पोलीस पथक देखील सदर आरोपी कैलास शिंदे याचा शोध घेत होते परंतु त्यांना देखील सदर आरोपी हा हुलकावनी देत होता व मिळुन येत नव्हता.
मा. पोलीस उप महानिरीक्षक नांदेड यांनी सदर आरोपी कैलास शिंदे यास अटक करणेकामी हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर येथील पोलीस अधीक्षक यांना आदेशीत करून योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रूजु झालेले पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी आरोपी कैलास रमेश शिंदे याचा कसोशीने शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि सुनिल गोपीनवार यांना योग्य त्या सुचना दिल्या व पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोनि उदय खंडेराय सपोनि सुनिल गोपीनवार, शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, नितीन गोरे, राजु ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांनी आरोपीची योग्य ती माहीती घेवुन आरोपी हा बोल्डा मार्ग वसमत कडे स्विफ्ट डिजायर कारने जाणार आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्यावरून वरील पथकाने बोल्डा शिवारात सापळा रचुन अत्यंत शिताफीने आरोपी कैलास रमेश शिंदे हा जात असलेल्या वाहनास अडवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक 6 एमएम पिस्टल, 02 जिवंत काडतुस 01 खंजीर असा व स्विफ्ट डिजायर कार असा एकुण 1315,500/रुपयाचा मुददेमाल जप्त करून पोलीस स्टेशन आ. बाळापुर येथे गुरन 558/2022 कलम 3/254/25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपी कैलास शिंदे याने हिंगोली, नांदेड, लातुर, परभणी जिल्हयात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व खुनाचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार सहा. पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, नितीन गोरे, राजु ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांनी केली आहे
No comments:
Post a Comment