माहूर - (प्रतिनीधी) माहूर ते किनवट रोडवर पेट्रोलींगवर असलेल्या सिंदखेड पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत एका पांढर्या रंगाच्या चार चाकी वाहणात पिस्टल असल्याची खाञीशिर माहिती मिळताच सिंदखेड पोलीसांनी माहूर तालुक्यातील अंजनखेड जवळ असलेल्या पुलाजवळ सापळा रचून केलेल्या कारवाईत माहुरच्या दोन जणांसह पिस्टल व वाहणाला ताब्यात घेवून गुन्हा नोंद केला आहे.
सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि भालचंद्र तिडके,पो.काॅ सोनकांबळे,नंदगावे हे खाजगी वाहणाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदारामार्फत खाञीशीर बातमी मिळाली की,एक स्विप्ट डिझायर कार पांढर्या रंगाची जिचा वाहन क्र.एम.एच २० सि.एस ०३२० मध्ये दोन इसम असून ते सारखणीकडून माहूरकडे जात असून त्या वाहनात पिस्टल आहे.अशी खाञीशीर बातमी मिळाल्याने पेट्रोलींगवर असलेल्या पोलीस पथकाने दि.७ में २०२२ रोजी सांयकाळी ५:३० च्या दरम्यान किनवट - माहूर रोडवर असलेल्या अंजनखेड नजीक असलेल्या पुलाजवळ सदर वाहणास थांबवून तपासनी केली असता दोन इसम अढळून आले.तदनंतर त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव ,गांव विचरले असता त्यांनी त्यांचे नांव शेख मोहसिन शेख सुलेमान व शेख अनिस शेख मुनिर सांगून माहूर येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलीसांनी नमुद वाहनाची तपासणी केली असता वाहनात एक नकली पिस्टल मिळून आली.
पो.हे.काॅ.हकीम खान सुलेमान पठाण यांच्या फिर्यादीवरुण सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाचा तपास स.पो.नि भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शखाली पो.उप.नि.जयसिंग राठोड हे करीत आहे.
No comments:
Post a Comment