Tuesday, May 10, 2022

शेकटा "नरेगा "प्रकरणात अजित पवार सीईओ यांनी काय कारवाई केली ? मंत्रालयाने मागविली फाईल.डाॕ.गणेश ढवळे यांनी केला पाठपुरावा .

गेवराई  (प्रतिनीधी) गेवराई तालुक्यातील शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कामात मजुर म्हणून चक्क मयत तसेच शासकीय कर्मचारी आणि बाल कामगार दाखवून बोगस जाॅबकार्ड बनवुन लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला होता, संबधित प्रकरणात ३ वेळा चौकशी लाऊन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरू होता या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब महानोर यांनी तक्रार केली होती तसेच माजी आमदार.बदामराव पंडीत ,भागवत महानोर यांनी तक्रारी केल्या होत्या या प्रकरणात काल दि.९ मे रोजी सीईओ अजीत पवार यांच्या कार्यालयात सुनावनी दरम्यान सुरूवातीस नंतर कारवाई करण्यात येईल म्हणत सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे यांनी या संदर्भात थेट मंत्रालयात तक्रार अर्ज केल्यामुळे   मंत्रालयातुन या संदर्भात अजित पवार यांनी काय कारवाई केली या संदर्भातील फाईल मागितली असुन दि.१२ मे गुरूवार रोजी मंत्रालयात केलेल्या कारवाई संदर्भात फाईल पाठवणार असल्याचे सांगत नंतर आपणास कळवण्यात येईल असे सांगितले.
 
 ३ समित्या नेमल्या अपहाराची रक्कम  कमी दाखवून अपहार दडपण्याचाच प्रयत्न जिल्हाप्रशासनाकडुन झाला 
_______
शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामातील गैरव्यवहार प्रकरणात ३ वेळा चौकशी होऊन सुरूवातीस त्रिसदस्यीय समितीत अपहार ३ लाख ९० हजार ७८१ रूपये सिद्ध झाला, त्यानंतर दुसरी समिती नेमली तिने अपहार १ लाख ९२ हजार ७८० रूपये सिद्ध झाला. त्यानंतर तिसरी समिती नेमली त्यात अपहाराची नोटीस केवळ २९ हजार रूपये दाखवण्यात आली ,एकंदरीतच मयत, नोकरदार, शालेय मुले रोहयो मजुर दाखवून अपहार सिद्ध होऊन सुद्धा गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ. 

 रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामातील भ्रष्टाचार प्रकरणात अपहाराची रक्कम कमी दाखवून गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करत असल्यामुळे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ डिसेंबर रोजी औरंगाबाद स्थित रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार, संबधित गटविकास आधिकारी पंचायत समिती गेवराई यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, त्या अनुषंगानेच शेकटा रोहयो कामातील गैरव्यवहार प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याविषयी फाईल मागवण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment