_
बीड (प्रतिनीधी) गुरूकुल इंग्लिश स्कूल अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तण प्रकरणात पालकांवरच दाखल करण्यात आलेले गुन्हे निषेधार्ह असुन रद्दबातल करण्यात येऊन संबधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी कायमस्वरूपी पोलीस अधिक्षक नियुक्ती करण्यात यावी
यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आक्रोश आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड,शेख युनुस च-हाटकर,सामाजिक कार्यकर्त्या अड.संगीता धसे, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना सचिन उबाळे, सामाजिक कार्यकर्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निळकंठ वडमारे, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे,बीड जिल्हाध्यक्ष शिवबा संघटना,हनुमान मुळीक, गोविंद बिक्कड, ज्ञानेश्वर ससाणे सहभागी होते.पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
____
दि.०८ एप्रिल रोजी बीड शहरातील गुरूकुल इंग्लिश स्कूल येथील शिक्षकाने इयत्ता ४ थी वर्गातील १० वर्षीय मुलीसोबत गैरवर्तण प्रकरणात शिक्षकांवर विनयभंग व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंग केलेल्या मुलीच्या पालकासह नातेवाईकांच्या मारहणीत शिक्षकास मार लागल्यामुळे त्यांना बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथुन त्यांनी पोलिसांना कल्पना न देताच पसार झाले, नंतर त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयातुन अटक करण्यात आली.
५ सदस्यीय समितीने अन्य ३ मुलींशी गैरवर्तण झाल्याचा अहवाल
____
सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी दि.११ एप्रिल रोजी जिलाहाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ),प्रभारी पोलीस अधिक्षक बीड यांची भेट घेऊन अन्य ईतर मुलीसोबत असा प्रकार घडल्याची कुजबुज पालकांमध्ये असुन चौकशीची विनंती केल्यानंतर मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी ५ सदस्यीय समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने अन्य ३ मुलींनी त्यांच्या सोबत शिक्षकाने गैरवर्तण केल्याचे अहवालात नमुद केले असून संबधित शिक्षकांवर अन्य ३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत.
पालकांची मारहाण निषेधार्हच पण सहानुभूतीपूर्वक विचार करावा
____
पालक नातेवाईकांनी शिक्षकास केलेली मारहाण निषेधार्हच आहे परंतु गुन्ह्याचे गांभीर्य अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तण आदि.परिस्थितीजन्य पुराव्यावरून सहानुभूतीपूर्वक विचार करून पालकांवरील खुनाचा प्रयत्न म्हणून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्दबातल करण्यात यावेत.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाऐवजी कायमस्वरूपी पोलीस अधिक्षक नियुक्त करावा :-डाॅ.गणेश ढवळे
___
बीड जिल्ह्य़ातील पोलीस अधिक्षक पदभार १७ मार्च ते १४ मे पर्यंत अतिरिक्त असुन सध्या बीड जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्था चिंतेची बाब असून घडत असलेल्या गुन्हेगारी दुर्घटना पाहता बीडला कायमस्वरूपी पोलीस अधिक्षक पदी नियुक्ति करण्यात यावी ज्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.
No comments:
Post a Comment