Wednesday, May 11, 2022

फुले दांम्पत्यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन भव्य स्मारक बांधावे - राजकुमार डाके


*परळी न.प.मुख्यधिकारी श्री.बोंदरे साहेबांना दिले निवेदन .

परळी वैजनाथ ( प्रतिनीधी ) महात्मा जोतीराव फुले व ज्ञानजोती साविञीबाई फुले यांनी आपले सबंध आयुष्य वंचीत, बहुजन, पीछडया समाजाला न्याय, शिक्षा, समता मीळवुन देण्यासाठी व मनुस्मृतीच्या गुलामगीरीतुन मुक्त करण्यासाठी आपले सपुर्ण आयुष्य वेचले त्यांच्या कार्याचे सदैव स्मरण व्हावे व त्यांच्या संकल्पनेतील समता प्रस्तापीत करण्यासाठी नागरीकांना सदैव प्रेरणा मीळण्यासाठी नांदेड, परभणीच्या धर्तीवर परळी शहरात मीलींद शाळेच्या बाजुला सावीञीमाई फुले चौकातील सरस्वती नदीवरील महात्मा फुले व्यापारी संकुल येथे ना.धनंजयजी मुंडे साहेब व गटनेते वाल्मीक आण्णा ककराड यांच्या माध्यमातुन फुले दांम्पत्याचे पूर्णाकृती पुतळे उभारुण भव्य स्मारक उभे करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके व माजी नगरसेवक रवि मुळे यांच्या वतीने महात्मा दिनाच्या निमीत्ताने न.प.मुख्याधिकारी श्री बोंदर साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे.
          विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले, ईतके अनर्थ एका अविद्येने केले असे जगाला ठणकावुन सांगत थोर समाज सुधारक, आद्य क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले व स्ञी शिक्षणाच्या जननी ज्ञानजोती साविञीमाई फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारे खुली करुन देत अंधश्रध्दा, रुढीपरंपरेतुन  मुक्तकरण्यासाठी  त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. बाल विवाह, सतीप्रथा, बालगृह, विधवा निराधार महिला गृह असे अनेक उपकृम सुरु करुण मनुस्मृतीने दुरकेलेल्यांना आधार देण्याचे व मानुस म्हणुन जगण्याचा अधिकार मीळवुन देण्याचे महान कार्य केले. स्ञीयांना चुल आणी मुल या बंधनातुन मुक्त करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला साविञी बाईंना शिक्षीत करुण ईतर मुलींना महिलांना शिकवण्यासाठी प्रवृत्त करुन स्ञि शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. सावीञीबाईंनी महिलांना शिक्षीत करुण विकासाच्या प्रवाहात आणत स्ञी पुरुष समानता प्रस्तापीत केली. त्यांनी जीवनभर बहुजन समाजातील उपेक्षीत समाजाला न्याय मीळवुन देण्यासाठी प्रयत्न केले अशा या थोर समाज सुधारक क्रांतीकारी दांम्पत्यांचा नांदेड व परभणीच्या धरतीवर ना.धनंजयजी मुंडे साहेब व गटनेते मा. वाल्मीक आण्णा कराड यांच्या माध्यमातुन परळी शहरात गणेशपार रोडवरील मीलींद शाळे जवळील साविञीमाई फुले चौकातील महात्मा फुले शाॅपींग काॅप्लेक्स येथे महात्मा जोतीराव फुले व ज्ञानजोती साविञीआई फुले यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारुण त्याठीकाणी फुले दांम्पत्याच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक उभारण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके यांच्यासह माजी नगरसेवक रवि मुळे यांच्यावतीने परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री बोदर साहेब यांना निवेदण देउन मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment