Monday, May 2, 2022

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी थांबेना. पोलीस प्रशासन हतबल.चोरांनी केली मध्यरात्री घरावर दगडफेक खिडक्याच्या काचा फोडल्या सी.सी.कॕमेरे तोडले.


*दगडफेक झालेल्या घरांमध्ये एका पोलीसाच्याही घराचा समावेश.

बीड (प्रतिनीधी) : बीड जिल्ह्यामधे गुन्हेगारी थांबता थांबेना… पोलीस प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी रोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना घडत आहेत. बीड शहरातील एका कॉलनीतील घरांवर चोरट्यांनी मध्यरात्री दगडफेक केल्याची घटना घडली आहे . 

विशेष म्हणजे ज्या कॉलनीवर चोरट्यांनी दगडफेक केली आहे , त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेही घर आहे .यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अशा प्रकारे धुमाकूळ घातलेला आहे . या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे . चोरट्यांनी घरे फोडण्याची , मारहाण केल्याच्या घटना सर्रास घडतात . मात्र अशा प्रकारे मध्यरात्रीतून दगडफेक करण्याची घटना फार ऐकिवात नाही . त्यामुळे या मागील नेमकं कारण काय आहे , हे पोलीस तपासा नंतरच समजणार आहे .बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे . या भागात मध्यरात्री एक वाजेनंतर अचानक काही घरांवर दगडफेक सुरु झाली . सुरुवातीला काय घडतंय हे लोकांना कळलंच नाही . नागरिकांनी घराच्या खिडक्या उघडून पाहिल्या असता हा प्रकार लक्षात आला .

चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे . काही घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या तर काही ठिकाणी सीसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली आहे . नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली . या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत .

No comments:

Post a Comment