Tuesday, May 3, 2022

केज तालुक्यातील तरनळी ते काळूची वाडी रस्त्याकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे दुर्लक्ष. येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.


केज ( प्रतिनिधी ) तालुक्यातील  तरनळी व काळूचीवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असलेली काळूचीवाडी ही वाडी डोंगरीपट्ट्यात येत असल्याने येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत दुरावस्था व रस्त्यावर मोठमोठी पडले असताना देखील याकडे भागाचे विद्यमान जि.प.सदस्य व आमदार यांच्यासह प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषध व पंचायत समितीच्या निवडणूकी पूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा येणाऱ्या जि.प.प.स. निवडणुकीच्या मतदानावर काळूचीवाडी ते तरनळी रस्त्यावरील सर्व मतदार  बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले जात आहे. 

केज तालुक्यातील तरनळी व काळूचीवाडी या ग्रुप ग्रामपंचायत आहे. तरनळी पासून अंदाजे पाच की.मी.अंतरावर असलेल्या काळूचीवाडीचा ५०० लोकसंख्या असलेल्या नागरिकांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता हा डोंगराच्या घाटातून जाणारा रस्ता आहे.काळूचीवाडी येथील नागरीकांना प्रशासन व लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणूक काळातच भेट देतात एकदा का निवडणूक झाली की या वाडीतील नागरिकांना भेटायला कोणी ही येत नाही. त्यामुळे या रस्त्याकडे शेतकरी सोडता कोणाचेही लक्ष जात नसल्याने हा रस्ता आजपर्यंत नादुरुस्त राहीला आहे.एखाद्या वेळी दिवसा देखील एखाद्या वयोवृद्ध माणूस अथवा महीला आजारी पडली तर किंवा महीलेला डिलिव्हरी साठी दवाखान्यात पाठवायचे असेल तर येथील नागरिकांना प्रश्न पडतो की या आजारी व्यक्ती व महीलांना दवाखान्यात कसे घेऊन जायचे अनेक वेळा नागरिकांनी या आपल्या आजारी नातेवाईकांना वाडीतून आपल्या पाठीवर घेऊन डोगरपार करून घुलेवस्तीवर आणुन तेथून पुढे वाहणाद्वारे दवाखाना जवळ केलेल्या अनेक घटना आहेत.

आजही काळूचीवाडी येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून काळूचीवाडी येथील रहिवासी लोकांची रस्त्यासाठी बेजारी होत असल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने येणाऱ्या जि.प.प.स.निवडणूकी पूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानावर काळूचीवाडी ते तरनळी रस्त्यावरील सर्व मतदार  बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment