Monday, May 16, 2022

महावितरणचा प्रताप मेंटेनन्सच्या नावाखाली सहा तास लाईट बंद. परमिट पेक्षा जास्त वेळ लाईट बंद करू लागले अभियंता.

 बीड (प्रतिनिधी)बीड शहरात महावितरण कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यात आणखी ऐक भर म्हणजे परमिट पेक्षा जास्त वेळ लाईट बंद करून भार उन्हाळ्यात जनतेला परेशान करण्याचे काम महावितरण चे अभियंता तसेच कर्मचारी करू लागले आहेत. 
बार्शी रोड, झमझम कॉलनी, खासबाग, भगवान बाबा प्रतिष्ठान, सोमेश्वर नगर, धांडे नगर या भागात दिवसभर बत्ती गुल करू लागले आहेत. 
शहरात उन्हाचा पारा चालीस च्यापुढे असताना देखील केवळ मेंटेनन्स (खंबा व तारा बदल )च्या नावाखाली शुक्रवार,शनिवार दिवसभर (सकाळी 11ते पाच )या वेळेत बत्ती गूल करून रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही होत आहे.मागच्या वर्षी च्या तुलनेने या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पंखे,कुलर, फ्रिज, एसि चा वापर वाढला असून भर दुपारी मेंटेनन्स च्या नावाखाली दिवसभर लाईट बंद केल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.महावितरण अधीक्षक यांनी याकडे लक्ष घालून परमिट ची वेळ कमी करून होणाऱ्या उकाडया पासून होणारा नागरिकांना बचाव करावा अशी मागणी नागरिकातुन होत आहे.

No comments:

Post a Comment