Tuesday, May 10, 2022

प्रवाशांच्या मागणीची दखल. परळी आगार ने सुरू केल्या परळी ते पुणे २ बसेस.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष देत परळी आगाराने मंगळवार दि.१० मे २०२२ पासून परळी ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी रात्री ७. ३० व रात्री ९.०० या वेळेत २ बसेस परळीतून सुरु केल्याने प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्स वाल्याकडून होणारी आर्थिक लूट आता थांबणार आहे.
सध्या लग्नसराई व शाळांना सुट्ट्या लागल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत आहेत. परळी ते पुणे बस रात्रीच्या वेळेत सुरु कराव्यात अशी प्रवाशांची मागणी होती. त्याची दखल घेऊन परळी आगाराने दि. १० मे पासून रात्री ७. ३० वा व रात्री ९. ०० वाजता परळी-पुणे (वल्लभनगर) या २ बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीची आगार प्रमुख भोंडवे व चालक प्रमुख अनिल बिडवे यांनी दाखल घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करून बसेस सुरु केल्याने प्रवाशी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
दिवाळी पासून खाजगी ट्रॅव्हल्सधारक प्रवाशांची आर्थिक लूट करून अव्वाच्या सव्वा प्रवाशी भाडे घेत होते. रेल्वेचीही बुकिंग फुल्ल असल्याने प्रवाशांना ट्रॅव्हल्स शिवाय पर्याय नसल्याने नाविलाजाने जे भाडे असेल ते देऊन प्रवास करावा लागत होता. आता परळी-पुणे या २ बसेस सुरु झाल्याने प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार आहे.

No comments:

Post a Comment