___
बीड जिल्ह्य़ातील बीड तालुक्यातील पालवन येथील गवळवाडी येथील रोपवन आगीत भस्मसात झाले होते त्यातच महिनाभरापुर्वीच देवराई-सह्याद्री-देवराई याठिकाणची झाडे आगीत भस्मसात झाली होती त्यामुळेच विविध भागातील वनविभाग अंतर्गत क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत असुन संबधित प्रकरणात जबाबदार वनविभागातील विभागीय वन आधिकारी (प्रा)सुनिल कंद, वनपरिक्षेत्र आधिकारी (प्रा)बीड अमोल मुंडे, वनपाल फुंदे बी. एस.,वनसंरक्षक मुंडे या आधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी तसेच वनविभागातील विविध गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी १० मार्च रोजीच्या तक्रारीवरून १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले होते .
उप आयुक्त समिक्षा चंद्राकर यांचे उपजिल्हाधिकारी (रोहयो)यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्याचे निर्देश
____
उप आयुक्त (रोहयो) औरंगाबाद समिक्षा चंद्राकर यांचे जिल्हाधिकारी बीड यांना तक्ररीच्या अनुषंगानेच संबधित आधिकारी/कर्मचारी यांची जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो)यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून प्रकरणात तोडगा काढावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ कार्यालयास पाठविण्याच्या दृष्टीने उचित निर्देश देण्याचे नमुद केले आहे.
No comments:
Post a Comment