परळी वैजनाथ (प्रतिनीधी): दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीरात 40 रूग्णांवर तपासणी करण्यात आली. डॉ.कौशल कोंडावार यांनी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केेले. परळीत प्रथमच युरोलॉजिस्ट संदर्भातील शिबीर पार पडले असून विविध आजारावर या शिबीरात तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
शहरातील मराठवाडा साथी दवाखान्यात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.दै.मराठवाडा साथी चे संस्थापक स्व.मोहनलाल बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या माध्यमातून,आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.सुरुवातीला श्रीराम यांच्या प्रतिमेचे आणि ध्वनंतरीचे पूजन करण्यात आले.शिबिराचे उदघाटन युरोलाँजीस्ट व अँड्रॉलाँलीस्ट तज्ञ डॉ.कौशल कोंडावार यांच्या हस्ते सकाळी 10 वा.झाले यावेळी डॉ कौशल कोंडवार यांचा सत्कार दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीश बियाणी यांनी केला.
शिबिरामध्ये मुतखडा, प्रोस्टेट संबंधी आजार, लघवी वाटे रक्त जाणे,सतत लघवी लागणे,ओटी पोटात दुखणे, लहान मुलांमध्ये मुत्र विकार, स्री यांमध्ये मुत्र विकार, अचानक लघवी थांबणे,लघवीसाठी जोर करावा लागणे,लघवीची धार कमी होणे, पुरुषांच्या मुत्र मार्गाशी संबंधित, प्रोस्टेट कॅन्सर,अंडाकोष कँन्सर,पेनाईल कँन्सर,मुत्राशय कँन्सर आदी करण्यात आल्या.तसेच, विविध विषयांवर डॉ.कौशल कोंडावार व डॉ.राजेश वाळके यांनी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केले.यावेळी, राधेश्याम झंवर, राजेश मोदाणी , विशाल जाधव,राजेश राठोड ,प्रेम जठार, आनंद तुपसमुद्रे, राठोड मँडम ,राजू इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment