Saturday, April 16, 2022

भगवान बाबा प्रतिष्ठान येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व फुले यांची जयंती उत्साहात साजरी....


शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा ऐक दिवस वाघ म्हणून जगा... डॉ. आंबेडकर 

 बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान येथे 
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिलां च्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता भगवान बाबा प्रतिष्ठान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली.बाबासाहेबांच्या वं महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांनच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,वंदन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून प्रकाश टाकला.यावेळी कौवल्य निसर्गन यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली."शिका संघटित व्हा संघर्ष करा",जाती तोडा समाज जोडा असे अनेक महान संदेश महामानवाने देशाला दिले,त्या विचारावर आज भीम अनुयायी चालत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलित शोषितांना न्याय तर दिला परंतु या देशाला स्वतःच्या कर्तुत्वावर जगावर अधिराज्य करण्याचा मंत्र राज्यघटनेच्या माध्यमातून दिला.भारत देशाला राज्य घटना लिहून देत देशात व जगात भारत देशाचे नाव गाजवले.बाबासाहेब एका भाषणात म्हणले होते की "राज्य घटना लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते "मतदाना चा अधिकार बाबासाहेबानी मिळाउन दिला,महिलांना त्यानचे अधिकार मिळउन दिले,त्यांचे कार्य अजरामर राहील असे मत मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना अभिवादन केले.आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रेरणादायी विचार त्यानी समाजाला दिलात्यामुळे बाबासाहेब एका जातीपुरते मर्यादित न राहता डॉ. बाबासाहेब सर्वांचे आहेत हा विचार समाजात रुजवन्याची जबाबदारी आपण पार पडली पाहिजे.या कार्यक्रमाचे आयोजन आनंद वीर, निलेश गलधर,मयूर कुलकर्णी  यांनी केले तर उपस्थिती नगरसेवक सुधीर भांडवले,नगरसेवक खुर्शीद आलम,जयशिंग मामा चुगडे,नीलकंठ वडमारे,संदीप उबाळे,विजय लव्हाळे,अप्पा कदम,नितीन जोगदंड, योगेश बहिरवाळ,महेश शिंघन,सुनील डोंगरे,राजेश शिंदे,संघमेश्वर अंधलकर,विश्वास आखाडे,बाबुराव कोरडे,आकाश जगताप,राजू कुसाळकर,सुशील कांबळे,संजय मिसाळ,कुमार फुलवरे,चेतन चक्रे,राजू कांबळे,राजू डोळस,दादा मिसळे,संगीताताई वाघमारे,मनीषाताई ससाणे,
या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रमुख पाहुणे,महिला,स्थनिक रहिवाशी,लहान थोर, तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.टाकणंखार सर,सहकार्य वाघमारे साहेब,संदीप केचाळे सर,महेश पिंगळे सर,घुमटकर सर,शिंदे सर,राजू कोरडे,दादा ओव्हाळ,वैभव लोंढे,सदानंद वीर,दीपक कोरडे,धनंजय जोगदंड,सौरभ बनसोडे,सुदर्शन भिसे,जय नाईकवाडे आदी उपस्थिती होती. उपस्थिताचे आभार आनंद वीर यांनी मानले

No comments:

Post a Comment