Saturday, April 16, 2022

नगरपालिकेची पाईपलाईन फुटल्याने रोडवर खड्डे ;नागरिकांना भोगावा लागतोय त्रास ;पाईप लाईन तात्काळ दुरुस्त करा न.प.कडे जि प सदस्य प्रदीपभैया (बबलू सेठ) मुंडे यांची मागणी !


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) टोकवाडी- नागापूर रस्त्यावर डाबी येथील राखेच्या तळ्याजवळ परळी नगरपालिकेची पाईप लाईन फुटल्यामुळे रोड वर पाणी साचून खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. पाईप लाईन फुटल्यामुळे  पाणी वाया जात आहे त्यामुळे नगरपालिकेने त्वरित पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप भैया (बबलू शेठ) मुंडे यांनी केली आहे.

डाबी या गावाजवळ असलेले राखेची तळे आहे तेथे पाईप लाईन फुटली असून त्यामुळे रोडवर पाणीच पाणी साठले आहे त्याचा परिणाम म्हणून रोडवर खड्डे पडत आहे मोटर सायकल स्वार यांना तसेच नागरिकांना याचा त्रास भोगावा लागत आहे. नागापूर- टोकवाडी रोडची त्यांनी पाहणी केली असता त्यांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनास कळविले. नगरपालिकेचे अधिकारी यांनी त्यांना महावितरण चा पोल मध्ये आल्यामुळे तेथील पाईप लाईन दुरुस्त करता येत नाही तसेच महावितरण कार्यालयाला नगरपालिकेने अर्ज केला आहे असेही त्यांनी सांगितले. महावितरण कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही त्यामुळे हे काम रखडल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गावरून मोठी रहदारी असते दूध वाले ऑटोरिक्षा वाले तसेच सायकलस्वार या मार्गावरून ये जा करतात ह्या मार्गावर पाणी साठवून मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे तेथे रात्री तसेच दिवसा एक्सीडेंट होत आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या खड्ड्यांमुळे निर्माण झाला आहे. नागरिकांना मणक्याचे त्रास, पाठीचा त्रास, श्‍वसनाचे त्रास, तसेच एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे आदींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नगरपालिकेने त्वरित पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment