Saturday, April 9, 2022

अभुतपुर्व स्मरणीय रामजन्मोत्सवाचे साक्षीदार व्हा! श्रीराम नवमी निमित्त भव्य- दिव्य पालखी सोहळा व मिरवणूकीचे आयोजन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब आणि न.प.गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती चे सदस्य वाल्मीक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस चे  युवक नेते राजेश फड यांच्या आयोजनात रविवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ठिक ८वाजता  भव्य पालखी सोहळा तसेच दुपारी ४वाजता मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

राम नवमी निमित्त  विशाल विराट शोभायात्रा ,डोळ्याचे पारणे फिटतील अशे अफलातून विविध पथक, आपल्या भारतीय संस्कृती चे दर्शन घडवणारा, आपल्या हिंदुत्व संस्कृती चे दर्शन घडवणारा, आलेल्या प्रत्येक अबाल बालक ज्येष्ठ सर्वांच्या मुखातून सहज जय श्रीराम हा जय घोष होणारच,  आपल्या परळी वैद्यनाथ  नगरीत प्रभू श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या भव्य ऐतिहासिक पालखी सोहळ्या  मध्ये यंदा अफलातून व अदभुत असे विविध पथक,टाळ मृदंग, संबळ, बॅन्ड पथक, पताका, खोडेस्वार  असणार आहेत, ज्यात  प्रभू श्रीराम यांची पालखी असेल,  सर्वाँना साद घालणारा अफलातून हलकी पथक, आपली संस्कृती जपणारे  नेत्रदीपक आकर्षक आकाशात उंच अशी जागो जागी भव्य अतिषबाजी, जय श्रीराम लिखित भगव्या टोपीपरिधान केलेले शेकडो  रामभक्त, भगवे फेटे धारी पुरूष आणि  महिला, जागोजागी सुंदर रांगोळी, पुष्पवृष्टी, शोभायात्रा मार्ग पूर्ण भगवामय,. उद्या आपली कांतीपूरी (परळी) नगरी पूर्ण भक्तीमय, होणार आहे. 
तय्यारी  पुर्ण झाली  आहे.  बस आपण आपल्या सहपरिवार, सहमित्र परिवार सादर आमंत्रित आहात. या  प्रभू श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या भव्य दिव्य विराट पालखी सोहळा ह.प.प.रामेश्वर महाराज कोकाटे, न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके, प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या  संकल्पनेतून होत आहे. रविवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ठिक ८वाजता छञपती शिवाजी महाराज चौक येथून पालखी सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब आणि इतर   मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून पुढे ही पालखी एकमीनार चौक, स्टेशन रोड, मोंढा, राणी लक्ष्मीबाई टावर चौक, गणेश पार येथील गोराराम मंदिर, सावळा राम मंदिर मार्गे अंबेवेश येथील काळाराम मंदिर या ठिकाणी दुपारी बारा वाजता. गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करून समारोप केला  जाणार आहे. तसेच दुपारी चार वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिर येथून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य रथामधून मिरवणूक निघेल पुढे मौलाना अबुल कलाम आझाद  आझाद चौक, छञपती शिवाजी महाराज चौक, एकमीनार चौक, स्टेशन रोड, पालीवाल कॉम्पेलेक्स,नांदेड टी हाऊस मार्गे राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे समारोप केला जाणार आहे. या सर्व सोहळ्या  मध्ये परळी शहरातील व तालुक्यातील भावीक भक्तांनी व नागरीकांनी  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  आयोजक *राजेश फड* अध्यक्ष *अभिजीत धाकपाडे* उपाध्यक्ष *अभिषेक औटी* *गणेश देशमुख* *बाबूराव फड* सचिव *साईनाथ विभूते* कोषाध्यक्ष *गजानन सुरवसे कार्याध्यक्ष  *नितीन बागवाले* सदस्य बालाजी डांगे सौरभ कापसे विठ्ठल साखरे विकास कदम बळीराम साखरे स्वप्निल सुरवसे अभिजित कस्तूरे गोविंद जाधव मुकेश घेणे संजय उमंजे अजय सुरवसे ऋषी फड गोविंद गरड गणेश भालेकर आदींनी केले आहे

No comments:

Post a Comment