Sunday, April 3, 2022

स्मृतिशेष दशरथराव शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. आंबेडकर जयंती बालक स्मृति वाचनालयास ऑफिस कपाट भेट.




परभणी (प्रतिनीधी) : स्मृतिशेष दशरथराव आसाराम शेळके तत्कालीन शासकीय सेवेत असूनही भारतीय बौद्ध महासभा मध्ये हयातभर एकनिष्ठ राहून सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होते, तसेच गरीब व निराधारांना मदतीचा हात दिला पाहिजे यासाठी प्रत्येकाने कटिबध्द असावे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. त्यांचे सुपुत्र तथा महाराष्ट्रातील परिवर्तनवादी अभ्यासक, निब्बाण फाऊंडेशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे प्रशिक्षक तथा नागनाथ महाविद्यालय, औंढा येथील प्रा.डॉ.सुरेश शेळके यांनी वडिलांच्या स्मृति दिनानिमित्त पारंपारिक रीतिरिवाजांना बाजूला सारुन एक आदर्शवत स्मृति दिवस साजरा केला.
मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी प्रत्येकाने पुस्तकावर प्रेम करण्याचा आदर्श मनाशी बाळगून ग्रंथालयांना समृद्ध केले पाहिजे ही भावना अंगीकृत करुन डॉ. सुरेश शेळके व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्र शासनाचा 'ब' दर्जा प्राप्त असलेले डॉ. आंबेडकर जयंती बालक स्मृति वाचनालयास एक ऑफिस कपाटाची भेट दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष टी.डी. दौंडे यांनी ग्रंथालय स्थापनेचा उद्देश व्यक्त केला तसेच आज बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष जनमित्र यशवंत मकरंद यांनी वाचन संस्कृती जोपासत विद्यार्थ्यांनी ज्ञान वृद्धिंगत करुन राष्ट्र सेवा करावी ही अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी संविधान सन्मान दलाचे अध्यक्ष रवि पंडित, संस्थेच्या सदस्या इंदिराबाई धाबे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष लखन सौंदरमल, निब्बाण फाउंडेशनच्या सचिव संघमित्रा शेळके, राहुल धबाले, प्रमोद अंभोरे, सिद्धांत सूर्यवंशी, सांची शेळके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment