Monday, April 4, 2022

सामाजिक न्याय मंत्री बाबासाहेबांच्या जयंतीला लंडनला जाऊन समाजासाठी काय संकल्प करणार? बंद पडलेल्या मागासवर्गीयांच्या योजना चालु केल्या तर समाजाचे हित होईल .


बीड (प्रतिनिधी) दि.04 महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  नामदार धनंजय मुंडे14 एप्रिल 2022 या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लंडन येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानात साजरे होणारे जयंतीला जाणार जयंती उत्सव समितीने त्यांनाआमंत्रित केले आहे त्यांच्या बरोबर इतरही लोक जयंती निमित्त जाणार आहेत.परंतु सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्या खात्यांतर्गत नव बौद्ध व अनुसूचित जाती जमातीच्या व मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्यापैकी दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजुरांसाठी सबलीकरण योजना ही अनेक वर्षांपासून बंद पडलेली आहे ती तत्परतेने राबवली जाईल? काय?मागासवर्गीयांसाठी समाज कल्याण व महात्मा फुले व विविध आर्थिक महामंडळाच्या अंतर्गत मागासवर्गीय विकास महामंडळांतर्गत जे तःच्या कल्याणासाठी कर्ज प्रकरणे होत असतात ते बंद पडलेले आहेत ते चालू होतील का ?मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दोन दोन तीन तीन वर्षापासून काही प्रमाणात मिळालेले नाहीत काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळाल्या आणि काहीच मिळालं नाही कुणाला बोलावं ऑनलाइन कॉम्प्युटरला, कॉलेज मध्ये चौकशी केली तर कॉलेज वाले म्हणतात आमच्याकडे काय नाही ऑनलाइन आहे ?सर्व जिल्हा कार्यालयात चौकशी केली तर ते म्हणतात होईल होईल मग बाबासाहेबांच्या जयंती ला जाऊन नामदार धनंजय मुंडे हे काय मागासवर्गीय समाजाचे कल्याण करण्याचा संकल्प करून वरील बंद पडलेल्या मागासवर्गीयांच्या सर्वच योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करावे संकल्प करावा हीच विनंती आहे केवळ भावनिक मुद्दे पुढे करून समाजाचे कल्याण होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष समाजाच्या विकासासाठी ज्या योजना आहेत त्या राबवल्या तर समाजाचे थोडेफार भले होईल

No comments:

Post a Comment