परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अभियांत्रिकी सेवा गट ब या परीक्षेत परळीतील कु अपर्णा गजानन चौधरी हिने घवघवीत यश प्राप्त केले.तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परळी येथील प्रसिद्ध भुसार व्यापारी कै.प्रभुआप्पा बाळाप्पा चौधरी यांची ती नात तर साधना ऑफसेटचे संचालक गजानन चौधरी यांची मुलगी आहे. तिने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment