Wednesday, April 6, 2022

बस स्टाॕण्ड परिसरात स्वखर्चाने सुरू केली पाणपोई. शिवसेनेचा उपक्रम तहानलेल्या प्रवाश्यांची वाटसरूची भागत आहे तहान.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): उन्हाळ्यात तहानलेल्या वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश विभूते यांच्या स्वखर्चातून बस स्टॅण्ड परिसरात पाणपोई च्या माध्यमातून थंड गार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाणपोई चे उदघाटन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण दादा सातपुते, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, जेष्ठ नेते भोजराज पालिवाल, पत्रकार संतोष जी जुजगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौधरी, उपशहर प्रमुख वैजनाथ मानेशहर समन्वयक सुदर्शन यादव, तुकाराम नरवाडे, अभिषेक विभूते, आदी उपस्थित होते. 
     उन्हाळा सुरू झाला की बस स्टॅण्ड परिसरात ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची एक घोट पाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांच्या वतीने  स्वखर्चातून बस स्टॅण्ड समोर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाटसरूंची तहान भागावी या निस्वार्थ भावनेने गेल्या  दोन वर्षा पासून पाणपोई सुरू करण्यात आली आहे या निस्वार्थ जनसेवेत खंड न पडू देता राजेश विभूते यांनी यावर्षी देखील आपली निस्वार्थ जनसेवा अखंडित सुरू ठेवली आहे.

No comments:

Post a Comment