Wednesday, April 6, 2022

अपंगाचा 5 % राखीव निधी वाटप करण्यात टाळाटाळ करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा - प्रा.लहूदास रोडे


*अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा यांचे कडून परळी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी ) दोनवेळा उपोषण करून ही अपंगाचा 5 % राखीव निधी वाटप करण्यात टाळाटाळ करणाऱ्या कन्हेरवाडी येथील ग्राम सेवकपरळी पंचायत समिती चे गटविकास आधिकारी संजय केंद्रे आणी तहसिलदार सुरेश शेजूळ या लोकसेवकावर आयपीसी सेक्सन 166,167, 427 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा यांचे कडून परळी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले दरम्यान मा.सुप्रिम न्यायालयातील   ललिता कुमारी / स्टेट आंफ उतर प्रदेश खटल्यांतील आदेशानुसार पोलीस प्रशासन आयपीसी सेक्सन 154 (1) नुसार गुन्हा नोंद करून घेणे बंदन कारक आहे   तरी पण  गुन्हा दाखल केला नाही तर मे. परळी न्यायालया मार्फत 156 (3)  नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणी यात परळी पोलीस प्रशासनास सह आरोपी करण्यांत येईल असे अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेने प्रसिद्धि पत्रा द्वारे कळवले आहे

No comments:

Post a Comment