Friday, July 10, 2020

आज पासून बीड जिल्हातील कृषी व्यापाऱ्याचे दुकाने तीन दिवस बंद.


बीड- (प्रतिनीधी ):- कृषी विक्रेत्यांनी मान्यता दिलेल्या कंपन्याकडून बियाणे सिलबंद स्थितीमध्ये खरेदी करून, सिलबंद स्थितीमध्ये शेतकर्‍यांना विक्री केले आहे. परंतू बियाणे उगवत नसल्याच्या कारणास्तव कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येवू नये, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पोस्टीसाईडस् सीडस् डिलर्स असोसिएशनच्या वतीने राज्यभरात आजपासून तीन दिवस बंद पुकारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील कृषी व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला असून जिल्हाभरातील सर्व कृषी दुकाने बंद ठेवण्यात आलेले आहेत.
   खरीप हंगाम २०२० चे खरीप हंगामाध्ये सोयाबीन व इतर बियाणे पेरणीनंतर उगवत नसल्याबाबत शेतकर्यांकडून येणार्या तक्रारीसंबंधी, राज्य संघटनेच्या कार्यालयाने दि.३० जुन २०२० चे पत्रानूसार विनंती पत्राव्दारे राज्याच्या कृषि विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्याकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून, सीलबंद स्थितीमध्ये शेतकर्यांना विक्री करत असल्याने, बियाणे उगवत नसल्याचे कारणास्तव विक्रेत्यास जबाबदार धरून त्यांचे विरूध्द गुन्हे दाखल करू नयेत. अशी विनंती व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरिही याबाबत न्याय कार्यवाही झालेली नाही. तसेच विक्रेत्याच्या अडचणी मांडून शासनाने समजून घेतल्या नाहीत. यामुळे कृषी विक्रेत्यांना मयत झालेल्या विक्रेत्यांच्या परवाना त्याचे वारसाचे नावे बदल करण्यात यावा. विक्रेत्याकडे मुदतबाह्य किटकनाशक औषधांचे साठ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने, मुदतबाह्य किटकनाशकांचा विक्रेत्याकडील विक्री न झालेल्या शिल्लक साठा, संबंधीत उत्पादक कंपनीचे परत जमा करून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पोस्टीसाईडस् सीडस् डिलर्स असोसिएशनच्या राज्यभरात आज दि.१० जुलै पासून १२ जुलै २०२० असे तीन दिवस बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये जिल्हाभरातील सर्वच व्यापार्‍यांनी सहभाग घेतला. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, अंबाजोगाई, वडवणी यासह इतर ठिकाणचे व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. व्यापार्‍यांच्या बंदमुळे शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत.  माजलगाव तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने तहसिलदार यांच्यासह तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन संघटनेचे अध्यक्ष ईश्‍वर होके, सचिव नंदकुमार आनंदगांवकर यांनी मागण्याचे निवेदन दिले आहे. इतर तालुक्यांच्या ठिकाणीही व्यापारी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. 

शेतकर्‍यांना का वेठीस धरता, 
व्यापार्‍यांनी कायदेशीर बाजू मांडावी
कृषी दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात येवू नये या मागणीसाठी आज व्यापार्‍यांनी बंद ठेवला आहे.  हा बंद म्हणजे शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. व्यापार्‍यांनी आपली कायदेशीर बाजू मांडायला हवी. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने या हंगामात शेतकर्‍यांची अडवणूक होता कामा नये. बोगस बियाणाबाबतीत व्यापारी कंपन्यांकडून कमिशन घेत नाही का? असा सवाल शेतकरी संघटनेचे गंगाभिषण थावरे यांनी केला आहे. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना विनाकारण वेठीस धरू नये आणि अशा पद्धतीचा बंद पुकारू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment