बीड (प्रतिनीधी )- राजूरी वेस ते कोतवाली वेस रस्त्यातल्या काही गल्ल्यांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने या भागाला कन्टेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे राजूरीवेस ते कोतवाली वेस रस्त्यावरील सर्व व्यापार बंद आहेत. खरं पाहिलं तर त्या भागातल्या गल्ल्या पूर्णत: बंद करून हा रस्ता कन्टेनमेंट झोनमधून वगळावा, अशी मागणी आता पुढे येत असून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या भागाची पाहणी करून ज्या गल्ल्यातले रुग्ण आहेत त्याच गल्ल्या सील केल्या जाव्यात, अशी मागणी या भागातून होत आहे.
गेल्या चार - पाच महिन्यांपासून कोरोनामुळे शहरातले उद्योग धंदे, व्यापार बंद आहेत. छोटेमोठे उद्योग व्यवसाय करणारे मेटाकुटीला आले आहेत. आर्थिक दृष्ट्या ते परेशान आहेत. अशा स्थितीत एखाद्या गल्लीत रुग्ण आढळला की, तो भाग पूर्णत: सील केला जातो. कालही जिल्हा प्रशासनाकडून कारंजा, अजिजपुरा, बलभीम चौक, छोटीराज गल्ली, काळेगल्ली, जुना बाजार या गल्ल्यातील दोन -तीन रुग्णांमुळे राजूरीवेस ते कोतवाली वेस व आजुबाजुचा परिसर बंद करण्यात आल आहे. राजूरीवेस ते कोतवाली वेस हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर शेकडो जणांचे छोटेमोठे उद्योग-व्यापारच्या दुकाना आहेत. खरे पाहिले तर वरील जेवढ्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्या पूर्णत: सील केल्या तर त्या भागातील लोक राजूरीवेस कोतवाली वेस या रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. परंतु गल्ल्या म्हणाव्या तशा कडेकोट बंद नाहीत आणि मुख्य रस्ता मात्र कडेकोट बंद ठेवला गेला आहे. त्यामुळे दोन-तीन महिन्यांपासून बंद असलेले व्यापार उघडता येत नाहीत. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या भागाची पाहणी करून हातावर पोट असणार्या छोट्या-मोठ्या उद्योग व्यापार्यांना राजूरीवेस ते कोतवाली वेसचा रस्ता सुरू करून अन्य गल्ल्या कडेकोट बंद कराव्यात, अशी मागणी या भागात होत आहे.
कलेक्टर साहेब, आम्ही ही बाब निदर्शनास आणू इच्छितो!
लोकांच्या जीवापेक्षा उद्योग व्यापार मोठे नाहीत. हे कोणीही मान्य करेल, परंतु परिस्थितीशी तोंड देताना छोट्या-मोठ्या व्यापार्यांना आर्थिक भार होऊ नये, राजूरीवेस ते कोतवाली वेस दरम्यान अनेक छोट्या मोठ्या दुकाना आहेत. त्या गेल्या तीन-चार महिन्यांपासून बंद आहेत. आताही या भागातील काही गल्ल्यांमध्ये बाधीत रुग्ण आढळल्याने राजूरीवेस ते कोतवाली वेस आजुबाजुचा परिसर बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी या परिसराची पाहणी करून ज्या गल्ल्यांमध्ये बाधीत रुग्ण आहेत त्या गल्ल्या शंभर टक्के सील कराव्यात, परंतु राजुरीवेस ते कोतवाली वेस हा रस्ता कन्टेनमेंट झोनमधून वगळावा, संबंधित गल्ल्या पूर्ण सील केल्या तर तेथून या रस्त्यावर एकही व्यक्ती येऊ शकणार नाही. परंतु शहरातला अन्य भागा अनलॉक असल्यामुळे येथील दुकाना सुरू राहिल्या तर येथील व्यापार्यांना आपले उद्योग-धंदे करता येतील.
No comments:
Post a Comment